लग्नं करतं असताना सौंदर्याला महत्त्व देऊ नका

लग्नं करतं असताना सौंदर्याला महत्त्व देऊ नका

आजच्या युगांत लग्नं जुळवने फार अवघड

लग्नं हा माणसाच्या जीवनातला एक महत्त्वपुर्ण विषय आणि घटक ही आहे . प्रत्येकाला वाटतं असतं की आपला होणारा जोडीदार हा चांगला असला पाहिजे हे प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं.म्हणून लग्नं करतांना एक योग्य जोडीदार मिळतोच पण त्याचं बरोबर दोन परीवारांचे आणि बऱ्याच नातेवाईकाचे प्रेम स्नेह नाते संबंध ही जुळतात .जीवनात लग्नं हे एकदाचं होतं पण प्रत्येकाला वाटतं आपलं लग्न हे अगदी धुमधडाक्यात झालं पाहिजे.वधू आणि वर या दोन्हीं ही माता ,पितांनाच्या अपेक्षा असतात की .आपल्या मुलांचे लग्नं चार चौघात पाहुण्यांत चांगले झाले पाहिजे तो एक जसा चर्चेचा विषयच झाला पाहिजे.म्हणून आपला मुलगा, मुलगी वयांत आल्यानंतर त्यांचे शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक आई, वडील त्यांना .नातेवाईक  गणगोतातील योग्य मुलगा ,मुलगी बघतं असतात.आणि त्यांसाठी त्यांची शोधाशोध ही चालूं असते .चार पाहुण्यांच्या कानांवर सुद्धा त्यांनी टाकलेले असते की एक चांगले स्थळं पाहा म्हणून.पण हल्ली आजच्या युगांत लग्नं जुळवने म्हणजे फार अवघड झाले आहे.

मुलींसाठी अपेक्षा

मुलांच्या बाबतीत मुलगा नोकरीला पाहिजे तो नसला तर घरी शेती पाहिजे किंवा कांहीं जोड धंदा पाहिजे. किमान कुठेतरी चांगल्या पैशांचे कामं तरी करतं असला पाहीजे.पण प्रथमतः नोकरीवरच पाहिजे ही अट सर्वांच्या तोंडी आहे .

मुलांसाठी अपेक्षा

दुसरा विषय मुलींचा तर मुलगी मुलांच्या घरच्यांना गोरी गोमटी पाहीजे नाक तोंड डोळे पानदार साजिरी गोजिरी .चेहरा दिसायला चांगला पाहिजे तिचे सौंदर्य हे खुलणारे पाहीजे .घरांत, गावांत नातेवाईकां मध्ये तिच्या सारखी कुणी सुंदर नसली पाहिजे अशी ही अपेक्षा मुलांची आणि आई वडिलांनची ही असते .

त्यातं परत त्यांना मुलींकडून चांगला हुंडा उदा .बस्ता डागीने ई पाहिजे.आणि लग्नं सुद्धा धुमधडाक्यात साजरे झाले पाहिजे अशा अपेक्षा असतात .पण मुलांच्या आणि मुलींच्या आईवडीलांना तसेच मुलगा आणि मुलींना सुद्धा सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की .लग्नं हे एक जंन्मोजन्मीच पवित्र बंधन आहे . म्हणून ते जुळवत असताना पैसा, अडका, सौंदर्य स्टेटस ,गरिबी , श्रीमंती याला कधीचं महत्त्व देऊ नका .

एक योग्य जोडीदार निवडताना

लग्नं संबंध जुळवताना.प्रथम मुलगा  निर्व्यसनी आहे का याची तंतोतंत खात्री करा .तो नोकरीवर नसला तरी चालेलं पण तो स्वतःला आणि परिवाराला सांभाळून आपले जीवन जगतो का हे विचारात घ्या त्याची प्रत्यक्ष शहानिशा करा .त्याचे शिक्षण किती झाले सामाजिक, नातेवाईक दैनंदिन जीवनात त्याचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे .त्याचा लाहान थोर मोठ्या माणसांच्या प्रती वागण्याचा बोलण्याचा राहण्याचा स्वभाव गुण कसा आहे हे तपासून पाहा .यालाचा चारित्र्य संपन्नतेचा दाखला असे म्हणतात हे मुलींच्या घरच्यानी आधी बघून घ्यावं.

मुलगी बघतांना

आणि मुलांच्या घरच्यांनी ही  मुलगी बघतांना तीचं नाकं, तोंड ,रंगा रुपाला ,सौंदर्याला देखणी आहे का हे कधीचं पाहू नये.एक मुलगी बघतं असताना तिचा स्वभाव,शिक्षण, राहिनीमान विचार सरणी याला महत्त्व द्यावे तिला घरं काम विचारा .तिची आवड ,निवड हे विचार तिला तिचे स्वातंत्र्य द्या .कारण मुलगी ही सर्वश्रेष्ठ असते तिचे घरं सोडून ती आपल्या घरांत आनंद घेवून येतं असते.म्हणून चांगला हुंडा बस्ता कपडा लत्ता यांची जास्त अपेक्षा मुलांच्या घरच्यांनी कधीचं करू नये .

जर हे जोडीदार निवडताना मुलगा , मुलगी आणि दोन्ही परीवारांनी ही विचारत घेतले आणि संबंध जुळवले तर नक्कीचं दोघांचे ही जीवन भाग्य उजळतील.आता काही कमी शिकलेले मुलं आहेत काहींच्या घरी शेती आहे .तर काही अगदी भुमीहीन आहेत काही उच्चं शिक्षित असून ही सध्या बेरोजगार आहेत . म्हणून त्यांचे लग्नं जुळवताना नोकरी पगार पाणी हे आधी पाहिल्या जातं.ग्रामीण भागांत ही हीच परिस्थिती आहे.म्हणून‌ मुलगा काम करून कुठे व्यवसाय खाजगी नोकरी करून जीवन जगणारा घर परिवार सांभाळणारा कमवणारा  निर्व्यसनी निवडा .

लग्नं करतांना सौंदर्याला कधीचं महत्त्व देऊ नका

तसेच शिकलेल्या मुला, मुलींनी ही दोघांचे विचार जुळतील याचा विचार करा .सध्या नोकरी मिळवणे अवघड झाले आहे हे सर्वांना माहीत आहे.पण जर दोघे ही शिकलेले असतील तर त्यांनी लग्नं संबंध जुळून घ्यावे.समोर दोघांनी ही शिक्षण नोकरी आणि व्यवसायांसाठी प्रयत्न करतं राहावे कारण प्रयत्न कधीचं वाया जातं नाहीत.दोघांत विचार जुळले की नातं आपोआप घट्ट बनतं.

म्हणून जोडीदार निवडताना लग्नं करतांना सौंदर्याला कधीचं महत्त्व देऊ नका .विचारसरणी व्यक्तीमत्व शांत स्वभाव माणुसकी आदर सत्कार चारित्र्य जिद्द चिकाटी मेहनत संस्कार वळण हे गुण पाहा हाच खरा मानवी डागीणा आहे .वय कुणासाठी थांबत नाही नोकरीच्या शोधात अनेक संबंध तुटून जातात.रंग रूप सौंदर्य हे सगळं काही नश्वर आहे म्हणून लग्नं जुळवताना दोन्ही परीवारांनी वधू आणि वरांनी ही योग्य विचार लक्षांत घेतलें पाहिजे.दोघांचे ही आयुष्य नक्कीच बदलल्या शिवाय राहणार नाही..!

Maratha Soyrik

लग्न सराई लेख आणी बातम्या

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

1 thought on “लग्नं करतं असताना सौंदर्याला महत्त्व देऊ नका”

Leave a Comment