लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न शायरी मराठी

लग्नवाढदिवस !

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हे एक असा पवित्र सोहळा आहे…
जिथे दोन जीवांचे मिलन होत…
जिथे  शपथ घेतली जाते जीवनभर साथ देण्याची…
जिथे वचन दिले जाते जीवनभर प्रेमाने आणि विश्वासाने नात जपण्याच…
खरंच तो क्षण , तो दिवस, तो सोहळा जीवनभर आपल्या आठवणीत राहतो आणि अश्या अतूट आठवणींना उजाळा म्हणून साजरा केला जातो तो म्हणजे लग्नवाढदिवस !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

असेच आज आमच्या सहजीवनाला वर्ष पूर्ण झालीत. घर , कुटुंब , नातेवाईकांचा मोठा गोतावळा , भूमीच्या शैक्षणिक व सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडत मला फुल टाइम वैद्यकीय व्यवसाय व थोडेफार सामाजिक कार्य करण्यासाठी वेळ देणारी , आयुष्याचा पावलोपावली आश्वासक साथ देणारी माझी सहधर्मचारिणी सौ.सुनितास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं…..
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा……
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा…..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……… लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे,……..
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….

कुठलेही दोन रंग एकमेकांत मिसळले की , जसे  एकरूप होऊन जातात तसं असतं नवरा बायकोचं लग्नानंतरचं नातं …

प्रेम , विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर ही त्रिसूत्री वापरली की कुठलंही नातं टिकतं आणि वृद्धिंगत होत जातं.आणि प्रत्येक संसारचा हाच तर भक्कम पाया असतो .

दोन वर्षाच्या ह्या सुंदर प्रवासात आपल्याला साथ देणारे  दोघांच्या घरातील नातेवाईक , मित्रमंडळी आणि इतर स्नेही हे सुदधा हा  सुंदर प्रवास आनंददायी होण्यास कारणीभूत आहेत.
कुठल्याही गोष्टीचे दुःख न जपता , मनात केवळ आनंद जपत पुढचाही प्रवास आपल्याला करायचा आहे .

आज पर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात कधी यश मिळालं तर कधी अपयश, परंतु या प्रवासात सु:खाची, दुःखाची साथीदार अन आयुष्यभराची जोडीदार माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.

कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारी माझी सहचारिणी सौ.अंकिताला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा !

आणि माझ्यावर आशीर्वादरुपी शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या आपल्या सर्वांचे आभार…!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस

माझ्या गुण आणि अवगुणांसाहित जीने मला स्विकारले त्या माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

मनासारखी बायको शोधणं सोप आहे, पण बायकोत मनासारखी मिळायला नशिब लागतं, माझं नशिब उत्तम आहे, यात शंकाच नाही.

अशीच कायम आनंदी रहा व माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा…
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…

माझ्या गुण आणि अवगुणांसाहित जीने मला स्विकारले त्या माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

मनासारखी बायको शोधणं सोप आहे, पण बायकोत मनासारखी मैञीण मिळायला नशिब लागतं, माझं नशिब उत्तम आहे, यात शंकाच नाही.

अशीच कायम आनंदी रहा माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा
आपल्या लग्नाच्या वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय रिंगमास्टर

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मित्र बंधू  आणि वहिनी
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली…
प्रेमाचे तसेच नाते,हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो आणि काळजात लपवून ठेवलेल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंगदराव & वहिनी happy anniversary

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा सरसचं ….! खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी असते , ती संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी, घरसंसारात रमणारी आणि त्यासोबत वेळ काढून माझ्या कामात मदत करणारी… जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको मैत्रीण आणि बरच काही. आज आपल्या लग्नाच्या 5 व्या वाढदिवसानिम्मित खूप खूप शुभेच्छा.

Khandeshi Maratha Soyrik

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

3 thoughts on “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

Leave a Comment