बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या’ ही बातमी वर्तमानपत्रात वाचली अन् मन सुन्न झालं. पैसे नाहीत म्हणून आपल्या तरुण मुलींचं लग्न कसं होणार या चितेनं कर्जबाजारी शेतकरी बापावर जो या जगाचा पोशिंदा म्हणविला जातो त्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. या घटनेवरून लक्षात येतं की, एकीकडे मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणारा बाप आणि दुसरीकडे केवळ बडेजाव म्हणून आपल्या मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी अमाप पैसा खर्च करणारे पालक अशा दोन टोकाच्या बाजू आजही समाजात आहेत.

पैशाअभावी आपल्या मुलीचं लग्न कसं होणार या विवंचनेतून एका बापास आत्महत्या करण्यास भाग पाडणारी व्यवस्था पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. महत्त्वाचं म्हणजे वयात आल्यावर प्रत्येक मुला-मुलीचं लग्न झालंच पाहिजे ही पालकांची मानसिकता असते. त्यांच्या मते आपल्या मुला-मुलींचं लग्न हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय असतं. विवाह संस्था ही सामाजिक दृष्टीनं आवश्यक बाब आहे. परंतु अंतिम ध्येय असायला नको.

जर मुला-मुलींचं योग्य वयात लग्न झालं नाही तर समाजही त्या कुटुंबाकडं संशयास्पद नजरेनं पाहत असतो. म्हणूनच सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक आई-बापाला वाटत असतं की योग्य वयात आपल्या मुला-मुलीचं लग्न होणं आवश्यक आहे. मात्र मुलीच्या लग्नासाठी पैसा नसल्यानं एखाद्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी आर्थिक दृष्टीनं सक्षम असणाऱ्या बुद्धीजीवी घटकांनी त्याचबरोबर सामाजिक संघटनांनीसुद्धा आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे.

जाणीवा आणि संवेदना बोथट ?

रोज वर्तमानपत्रात अशा शेतकरी आत्महत्येच्या अनेक बातम्या येतात, परंतु आमच्या जाणीवा आणि संवेदना इतक्या बोथट झालेल्या आहेत की, आम्हाला त्याविषयी काहीच वाटत नाही. आम्ही सारे भारतीय बांधव आहोत, हे फक्त प्रतिज्ञेपुरतेच शिल्लक राहिलेलं आहे की काय असं वाटतंय. कारण जे शेतकरी आत्महत्या करतात ते काही आमच्या रक्ताचे नाहीत म्हणून; आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, हीच आमची भावना. परंतु मरणारी व्यक्ती हीसुद्धा कुणाचा तरी मुलगा असतो, पती असतो, बाप असतो, भाऊ असतो, त्याच्या जाण्यानं त्यांच्यावर किती मोठा आघात होत असतो हे त्यांचं त्यांनाच माहीत असतं.

कुणाला वाटत असतं का, की असं आपलं अनमोल जीवन अशा पद्धतीनं स्वतःच संपवावं? मात्र परिस्थितीच त्याला भाग पाडत असते. आपल्या बोथट झालेल्या जाणीवा आणि संवेदना बाजूला ठेवून किमान आपण त्यांचा मानसिक आधार तरी बनू शकतो का यादृष्टीनं थोडा विचार करणं आवश्यक आहे. कारण तेही आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत हे विसरून चालणार नाही.

प्रणाली मराठे

मुख्य सोयरीक लेख आणी बातम्या

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

2 thoughts on “बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या”

Leave a Comment