लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

लग्न शायरी मराठी


अशीच राहा हसत खेळत हेच एक सांगणे आहे
अशीच प्रगती होऊ दे तुझी हेच देवाकडे मांगने आहे !

झोळी माझी खाली असताना, लग्न माझ्याशी केलेस तु…
प्रेम केले माझ्यावरी, विश्वासही तेवढाच दाखवलास तु…

आयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर, सोबत माझी केलीस तु…
जरी वाटेवर होते धुके दाट, तरीही संसार सुखाचा केलेस तु…

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री चांगलीच निभावलीस तु…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला चांगलेच सांभाळलेस तु…

अशीच रहा हसत खेळत, हेच एक सांगणे आहे…
स्वप्न तुझी पूर्ण होऊदे, देवाकडे हेच मागणे आहे…

माझ्या प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
I Love You Dear

__________________________________________________________

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या क्षणी आपला विवाह संपन्न होतो त्या क्षणापासून तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रत्येक सुख – दुखात…
आपल्या जिंकण्यात….
आपल्या हारण्यात नेहमी आपली सावली बनून स्पष्टपणे आणि प्रभावीपणे उभी राहते…
ती म्हणजेच आपली #बायको…!

बायको म्हणजे
बा – बाजुशी उभी राहणारी…!!!
– येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी…!!!
को – कोणासाठी नाहीतर नवऱ्यासाठी जगणारी…!!!

आयुष्यातल्या प्रत्येक चढउतारात, सुख दुःखात माझ्यामागे खंबीरपणे उभी राहुन मला साथ देणारी…!!!
पत्नी, आई, मावशी, लेक, सुन, काकु, वहिनी, मामी, बहीण  अश्या कित्येक नात्यात वावरताना ती कायमच वरचढ ठरली आहे.

__________________________________________________________

आजचा लग्न वाढदिवस अनमोल असावा..!
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा, इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे. आपल्या दोघांना चांगले आरोग्य सुखसमृद्धी,दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!!!

तुमची ही साथ सात जन्म अशीच रहावी प्रत्येक क्षणी आयुष्यात तुमच्या प्रेमाला नवी पालवी फुटावी..!!!

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… भाऊ आणि वहिनी साहेब

__________________________________________________________

न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
माझी बायको .

आयुष्यातल्या चढ उतारात,
सुखदुःखात माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहून
मला साथ देणारी .. माझी बायको.

माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन..

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Anniversary Bayko.

__________________________________________________________

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे

मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून तु

माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच …

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

Happy Marriage Anniversary Dear Wife.

__________________________________________________________

धरून एकमेकांचा हात,
नेहमी लाभो आपली एकमेकांना साथ,
येत्या आयुष्यात आपली सर्व स्वप्न साकार व्हावी हीच आमची इच्छा.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जबाबदारीने फुललेले.
आनंदाने नांदो हा आपला
संसार सुखाचा..हीच प्रार्थना जोतिबाला..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

__________________________________________________________

प्रेमात पडल्या नंतर माणसे एकमेकांचे फक्त कौतुक करतात .पण संसारात मात्र ती एकमेकांनां समजून घेऊ लागतात .प्रिय बायको तुला दोन शब्दात मांडणे म्हणजे तुझी मस्करी केल्या सारखे आहे .तुझी माझ्या आयुष्यातील जागा हि दोन शब्दात कधीही मांडू शकत नाही.

लग्न झाल्या पासून ते आज पर्यन्त तू मला सगळ्या गोष्टींमध्ये किती सपोर्ट केलास . तू माझ्या कडे माझ्या बद्धल केलेल्या हजारो तक्रारी ,मला बदलायचे केलेले कित्येक प्रयत्न जे आजही तू करतेस आणि करत राहा .जसे आज पर्यंत तू माझ्या घराला आणि माझ्या कुटुंबाला संकटात सांभाळत /आवरत आलीस तसेच मलाही आवरत राहा ,सावरत राहा गोधळून जातो मी कधी कधी ! आज शब्द लिहताना जरी मी लेखक नसलो तरी माझ्या संसाराची खरी लेखक तूच आहेस. हे मात्र निश्चित.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

__________________________________________________________

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…..

उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस… मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते… प्रेयसी असते… ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.

बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात…. अशीच माझी बायको समजूतदार…. नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी… घरसंसारात रमणारी….

जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही…!

लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय बायको

__________________________________________________________

Happy anniversary dear ( बायको ) उंबरठयावर माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस.. मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेलो. खरोखर बायकोही एक मैत्रीण असते… प्रेयसी असते… ती संसाररूपी रथाचा एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील दु:ख कमी होतात आणि सुख  द्विगुणित होतात… अशीच माझी बायको समजूतदार… नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी . . घरसंसारात रमणारी…जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही…!
माझ्या प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा    

__________________________________________________________