Table of Contents
बँकेत नोकरी करणाऱ्या उच्चशिक्षित मुलीचा आई-वडिलां जवळ हट्ट “बाबा मला शेतकरी नवराच हवा”
सध्याच्या काळात कमी शिकलेली गाव खेड्यातील मुलगी असली तरी आपला जोडीदार शेतकरी नको, तो नोकरदार हवा असे म्हणून हट्ट करते. मात्र एका उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलीने मला शेतकरी नवरा करायचा आहे असा म्हणून हट्ट धरला मुलीच्या हट्टापुढे आईवडील यांचेही काहीच चालले नाही शेवटी त्यांनी मुलीची इच्छा पूर्ण केली.
अलीकडील आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून जवाई नोकरीवाला शोधतात मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात, शिक्षक इंजिनियर बँकेत पोलीस आदी क्षेत्रात मुली नोकरी करत असून त्यांच क्षेत्रात नोकरी करणाऱ मुलगा शोधतात. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी मुलाला सहसा मुलगी स्थळ भेटणे अवघड झाले आहे.महानगरात राहायचे स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलासोबत लग्न करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही.
तीन शाखांत पदवीधर आई-वडिलांनीही केला लेकीचा हट्ट पूर्ण
तीन शाखांत पदवीधर, त्यानंतर पीएच.डी.चे शिक्षण सुरू असताना व एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या साप्ती गावातील वैष्णवी हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे, असा वडिलांकडे हट्ट धरला. हा तिचा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला. ९ जुलै रोजी एका शेतकरी मुलासोबत वैष्णवीचा विवाह पार पडणार आहे.
हदगाव तालुक्यातील साप्ती येथील दिगांबर आनंदराव कदम हे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्यांची वैष्णवी ही एकुलती एक मुलगी कुटुंबात लाडात वाढलेली अन् हुशार आहे. वडिलांनी तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिले. वैष्णवी तीन शाखांत पदवीधर असून, सध्या तिचे पीएच.डी.चे शिक्षण सुरू आहे. ती सध्या खासगी बँकेत नोकरी करीत आहे.
मुलगी उपवर झाल्याने वडिलांनी तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा बाबा, मला फक्त शेतकरी नवरा पाहिजे. तुम्ही स्थळ बघताना शेतकरीच मुलगा बघा, असा हट्ट धरला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरी मुलगा नितीन याच्याशी ९ जुलैला विवाह निश्चित केला. या विवाहाची चर्चा परिसरात होत आहे.
आयुष्याचा जोडीदार शेतकरी निवडला
शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही. परंतु, तीन शाखांत पदवीधर, त्यानंतर पीएच.डी.चे शिक्षण सुरू असताना व एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या साप्ती गावातील वैष्णवी हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे , असा वडिलांकडे हट्ट धरला.
एकच मुलगी असल्याने तिचे मी लाड पुरवले
मला एकच मुलगी असल्याने तिचे लहानपणापासून मी लाड पुरवले. तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला शेतकरीच पाहिजे होता, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे तिचा हा हट्ट पूर्ण केल्याचे मला समाधान आहे. -दिगांबर कदम, नववधूचे वडील.
Maratha Soyrik Khandeshi Maratha Soyrik
लग्न सराई लेख आणी बातम्या
आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास
विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी
What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?
फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले
लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द
1 thought on “बाबा मला शेतकरी नवराच हवा”